बुलढाणामहाराष्ट्र

मा. खा. रामजी गौतम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ॲड सुनील डोंगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मान्य काशीराम साहेब यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त वर्धा येथे भव्य झोन कार्यकर्ता मेळावा संपन्न

मा. खा. रामजी गौतम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ॲड सुनील डोंगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मान्य काशीराम साहेब यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त वर्धा येथे भव्य झोन कार्यकर्ता मेळावा संपन्न….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी , रतन भगत.( वर्धा) दि.१५/३/२०२६ रोजी मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त वर्धा येथे विदर्भ मराठवाडा बसपा झोनच्या वतीने संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार रामजी गौतम साहेब म्हणाले की आमचे महापुरुष फुले शाहू आंबेडकर यांनी जी परिवर्तनाची चळवळ लावली त्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला कांशीरामजींनी राष्ट्रीय पातळीवर आणून ठेवले आहे. त्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आवाहन विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा निमित्त बसपाचे केंद्रीय कॉर्डिनेटर व महाराष्ट्राचे प्रभारी राज्यसभा संसद रामजी गौतम यांनी केले आहे. दोघेजण समाज पार्टीच्या वतीने कांशीराम यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीने विदर्भ व मराठवाडा स्तरीय भव्य कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केले होते त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष सुनील डोंगरे यांनी मार्गदर्शनातील सांगितले की बहुजन समाजाला शासनाप्रती जमात बनवायची अशी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती ती शक्य करण्याचे काम माननीय कांशीरामजी यांनी केले आहे. आणि म्हणूनच आपले महापुरुष व विचारधारा सोडून काँग्रेस भाजपा व सभा यासारख्या पार्ट्या कांशीराम ची जयंती साजरी करायला लागले आहेत हे आपल्या चळवळीचे फार मोठ्या प्रमाणात यश असले तरी यांच्यापासून सावध राहावे असे सुद्धा त्यांनी सांगितले. सोबतच राहुल गांधी एखाद्या पोपटासारखे बोलत असल्याचे यावेळी एडवोकेट सुनील डोंगरे साहेब म्हणाले. कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मुकुंद दादा सोनवणे बोलताना म्हणाले की देशभरातील एससी एसटी आदिवासी आणि ओबीसींची राजकारणात झालेली पीछेहाट चोहोकडे धर्मांधतेने गाठलेला कळस अंधश्रद्धेच्या नावाखाली देवांच्या नावाने होत असलेले दुर्दशा ही थांबवायचे असेल तर सत्य शिवाय पर्याय नाही हे ओळखून मान्यवर कांशीराम साहेबांनी अंधाऱ्या वस्तीत भिमान लावलाय दिवा या गाण्याप्रमाणे सर्व देशांमध्ये जय भीम चा नारा देऊन हे होऊ शकतं हा नारादेखील देऊन बहुजन समाज एकत्र केला. या हरलेल्या समाजाला नवचैतींना देऊन या धर्मांध देशात पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मुख्यमंत्री दिला तेही एकदा दोनदा तीनदा नवे तर चार वेळा उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशातला महिला मुख्यमंत्री देऊन दाखविला आणि सांगितले की हे सुद्धा होऊ शकते. पुढे बोलताना ते म्हणाले की जेव्हापासून बहन कुमारी मायावतीने माननीय सुनील डोंगरे यांच्या खांद्यावर बसपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली आहे तेव्हापासून त्यांच्या खुशीने संघटन महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात समानता निर्माण केली आहे. एकानंतर एक अशीच एक चौरस कार्यक्रम घेऊन मृत अवस्थेत गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी दिली. याचा प्रत्यय म्हणून वर्धा येथील बसलेल्या जयंतीनिमित्त बसलेला जनसमुदाय होय. महिला नेत्या डॉक्टर विद्याताई रुईकर यांनी या प्रसंगी दमदार असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव डॉक्टर मोहन कुमार यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा सचिव सुरेश दूध हे तर समोर जिल्हाध्यक्ष अनुपदर्शी भाई सारे यांनी केला.
मंचावर महाराष्ट्र प्रदेशचे कृषी अध्यक्ष अब्दुल रोप प्रदेश महासचिव नागोराव जयकर प्रीती शिंदे प्रदेश सचिव दादाराव विखे जालना बुलढाणा जिल्हा प्रभारी पंडित बोर्डे, विवेक हाडके, प्रफुल्ल मानके दीपक पाटील महेंद्र मकेश्वर मुस्लिम भाई जरा कमिटीचे झोनप्रमुख मोहसीन शेख ओबीसी नेते स्कर्मिस खडसे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष विजय बचके, जालना जिल्हाध्यक्ष अनिल चित्ते मंचावर उपस्थित होते. विदर्भातील सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष व स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले सदस्य उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल काही कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सत्कार सुद्धा करण्यात आला. सभेतील उपस्थिती लक्षणे होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव किशोर मेंढे जानकी रावजी ठोंबरे, बामसेख संयोजक मंदाताई नाकले, जिल्हा संयोजका प्रज्ञा दुपट्टे, जिल्हा प्रभारी वैशाली कांबळे, जिल्हा महासचिव सुधाकर जून घरे, निखिल भगत, शरद वानखडे सर इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक असे प्रयत्न केले. शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विकास राजा या बलावंताने उपस्थित जनतेचे जोरदार असे प्रबोधन केले….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button