सुनगावमध्ये धक्कादायक घटना : ग्रामपंचायत सफाई कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
सुनगाव दि. १२ मार्च २०२६
(ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) –
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या एका सफाई कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे घटना 10 मार्च ला सकाळी घडली असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता. दररोजप्रमाणे कामावर जाण्याऐवजी तो घरीच असल्याने कुटुंबीयांना संशय आला. घरात पाहणी केली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी तातडीने जळगाव जामोद पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली असून आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक किंवा आर्थिक तणावामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे सुनगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी मृत व्यक्तीबद्दल हळहळ व्यक्त केली आहे….✍️



