महाराष्ट्रमुबई

न्यू तुळजाई सेरेनिटी ग्रीन्स मध्ये प्रिमियर क्रिकेट लीगच्या माध्यमातून एकता

न्यू तुळजाई सेरेनिटी ग्रीन्स मध्ये प्रिमियर क्रिकेट लीगच्या माध्यमातून एकता

शहापूर – सचिन शेलवले (वासिंद ) दिनांक 1/3/2026 रोजी न्यू तुळजाई ग्रीन्स सेरेनिटी वासिंद येथे सर्व परिसरातील रहिवासी नोकरीच्या निमित्ताने स्थायीक झालेले असुन वय वर्षे २५ ते ५५ च्या वयातील सुशिक्षीत तरुण रोज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येऊन फिटनेस राहण्यासाठी तसेच एकोपा, ऐकमेकांबददल प्रेमाची भावना वाढीस लागण्यासाठी रात्रीच्या वेळी थोडा वेळ क्रिकेटचा सराव करतात . व दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दुसऱ्या पर्वात तुळजाई क्रिकेट प्रिमीयर लीग आयोजीत करण्यात आली होती . या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून तुळजाई फाउन्डेशनचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व सदस्य उपस्थित होते . त्यांच्या हस्ते क्रिकेट प्रिमियर लीगचे उद्घाटन झाले . महत्वाचा उद्देश क्रिकेटच्या माध्यमातून सर्व एकत्र येतात . तसेच शरीराचा व्यायाम फिटनेस पणा वाढतो . तसेच त्या माध्यमातून तरुण मुले सामाजिक बांधीलकी म्हणून सामाजीक कार्यात सुद्धा सहभाग घेतात . तरुणांमध्ये सर्व आपापल्या परीने सहकार्य करून आर्थिक सहभाग नोंदवून लागणारे साहित्याची जुळवा जुळव करून आनंदाच्या वातावरणात रात्रीच्या वेळी किकेटचे आयोजन करतात . यामध्ये नवतरुण, युवापिढी, लहान मुले तसेच सेवाजेष्ठ माणसे तसेच महिला मंडळ यांचे सुद्धा प्रेक्षक म्हणून सहभाग असतो . क्रिकेटचे नियम सर्व जण पाळून कुठल्याही प्रकारे भांडण तंटा न करता सर्वाना समान न्याय देत खेळीमेळीच्या वातावरणात व आनंदाने होळीच्या निमित्ताने हा खेळ खेळतात . होळी सण २ सुद्धा सर्व सोसायटी एकत्र येऊन साजरा करतात .दुसऱ्चा दिवशी सर्व सोसायटीतील लोक रंग उधळण्याचा धूळवड खेळण्याचा कार्यक्रम एकत्र येऊन करतात .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button