जि .प .कें.म. प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे रंगपंचमी उत्साहात साजरी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
जळगाव जामोद :” दि. 28 फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, पिंपळगाव काळे येथे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली..
शाळेत रंग आणून रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी शाळेत येताना सोबत कोरडे कलर आणले होते तसेच शिक्षकांनीही आणले होते शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नात्याला रंगपंचमीचा कलर लावून ते नातं अजूनच घट्ट करण्यात आलं.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकही सहभागी झाले होते
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कलर लावला विद्यार्थ्यांनीही आनंदाने शिक्षकांना कलर लावला.
त्यानंतर मुलांना खाऊ देऊन व होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शाळेत होळी खेळायला मिळाली याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता सर्व विद्यार्थी हे आनंदाने सर्व कार्यक्रमाचा आनंद घेत होते
“स्वच्छता हीच सेवा” हा मंत्र केवळ शाळेपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या जीवनाचा भाग कसा बनवता येईल, यावर अनमोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेतील सर्व आदरणीय शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.



