बुलढाणामहाराष्ट्र
क्राईम डायरी: घरफोडी, हाणामारी आणि वादाच्या घटनांनी हादरला बुलढाणा जिल्हा

क्राईम डायरी: घरफोडी, हाणामारी आणि वादाच्या घटनांनी हादरला बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी .हरिदास. इंदोरे नांदुऱ्यात बॅग लिफ्टिंग, बुलढाणा, जळगाव जामोदमध्ये हल्ला, तर डोणगाव, किनगाव राजामध्ये घरफोडी.बुलढाणा जिल्ह्यातीलविविध पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या ४८ तासांत चोरी, मारहाण आणि धमकीचे गंभीर गुन्हे घडल्याचा प्रकार समोर आला. डोणगाव आणि किनगाव राजा येथे घरफोडीच्या घटना घडल्या असून, जळगाव जामोद व बुलढाणा शहरात मारहाणीचे गुन्हे दाखल झाले. गंभीर गुन्ह्याच्या वाढत्या घटना पोलिसांसाठी डोकेदुखी तर जिल्हावासियांसाठी दहशत निर्माण करणाऱ्या ठरत आह. पालिसाना उपराक्त सव प्रकरणात कायदेशीर कारवाई करून तपास सुरू केला आहे.



