खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिकसामाजिक

शिवगर्जने सह मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवजन्मोत्सव सोहळा.


मुक्ताईनगर दि २० (प्रतिनिधी )
जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
१९ फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात अत्यंत उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते.येथील जे ई स्कूल मध्ये ही अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता संस्थेचे सचिव डॉ सी एस चौधरी, उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी आणि संचालक महेश भाऊ पाटील तथा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक अशा आसनस्थ मूर्तीपूजनाने तथा शिवरायांच्या आरतीने झाली.महाराजांची जयंती साजरा करण्याचा उद्देश म्हणजे हा दिवस केवळ सुट्टी चा दिवस नसून ती आपल्या रयतेच्या राजप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे एस आर ठाकुर यांनी आपले प्रास्ताविक करून कार्यक्रमास सुरुवात झाली.शाळेच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्यात विद्यालयातील जवळ जवळ ४०हून अधिक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी गीत,पोवाडे, शिवगर्जना, शिव काव्य , वक्तृत्व सादर करून उपस्थितांची मने जिंकून सहभाग नोंदविला.ज्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले.काही विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषा करून मराठा शाहीची आठवण करुन दिली. कु जान्हवी पाटील हिने माता जिजाऊ च्या भूमिकेतून , कु देवेश्री पाटील हिने पोवाड्यातून तर कु शर्वरी पाटील हिने शिवगर्जनेतून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याची महती सांगितली.
संस्थेचे सचिव डॉ सी एस चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची ओळख करुन दिली.महाराज एक आदर्श राजे होते.त्यांनी शिस्तबद्ध सैन्य, भक्कम गडकिल्ले आणि प्रजेची काळजी घेणारी व्यवस्था निर्माण केली.प्राचार्य व्ही एम चौधरी यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज्य’ संकल्पनेवर आणि त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर प्रकाश टाकला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तू देऊन त्यांना शाबासकी दिली. एम एम पाटील मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.तर पाहुण्याचा परिचय आणि आभार एस एस कोलते मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनचे सहकार्य लाभले….!!!!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button