रोहित पवारांचा आरोपलोकांना अमिष दाखवून भाजपाच्या सभेला आणलं जातं.

रोहित पवारांचा आरोपलोकांना अमिष दाखवून भाजपाच्या सभेला आणलं जातं.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी
प्रफुल्ल पहूरकर
भाजपच्या सभांना आमिषे दाखवुन लोक आणली जातात. बचत गटांना निधी देऊन महिलांना खूश केले जाते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी कल्याण येथील जाहीर सभेत बोलताना केला. वातावरण भाजपच्या विरोधात असले तरी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करुन लोकांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य द्यावे आणि आपली लढाई जिंकण्यासाठी आहे, याचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला.कल्याण येथील खडकपाडा भागातील स्प्रिंग टाईम सभागृहात आमदार रोहित पवार यांची शुक्रवारी सभा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश नेते महेश तपासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस फोडली म्हणजे आपण सात ते आठ टक्के मतदान मिळवून लोकसभेत पुढे जाऊ असा विचार करुन भाजपने राष्ट्रवादी फोडली. हा प्रकार करुन त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना डिवचले आहे.असेही ते म्हणाले.



