खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरात शिवजयंतीनिमित्त भव्य निबंध स्पर्धा“लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर”

मुक्ताईनगर : या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने युगपुरुष यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर शहरात भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाराजांचे विचार, त्यांचा स्वराज्यासाठीचा संघर्ष, लोककल्याणकारी नेतृत्व, तसेच गड-किल्ल्यांचे महत्त्व या विविध अंगांनी विद्यार्थ्यांनी चिंतनपूर्वक लेखन करावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये शिवविचारांचे बीजारोपण व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.

ही निबंध स्पर्धा मुक्ताईनगर येथील सहा केंद्रांवर पार पडली. प्रत्येक केंद्रावर महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली.

प्रथम गट (इयत्ता ५ वी ते ८ वी)
या गटातून तब्बल ३२१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
विषय –
१) शिवराय माझे आवडते राजे
२) छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि जिजाऊंचे संस्कार
३) छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले संवर्धन : काळाची गरज

द्वितीय गट (इयत्ता ९ वी ते १२ वी)
या गटात ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विषय –
१) छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरण
२) आजच्या काळात शिवविचारांची गरज
३) भारतीय नौदलाचे जनक : छत्रपती शिवाजी महाराज

तृतीय गट (वरिष्ठ महाविद्यालय)
या गटातून २९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
विषय –
१) स्वराज्य ते सुराज्य : एक प्रवास
२) शिवराय : एक सर्वसमावेशक लोककल्याणकारी राजा
३) शिवरायांचे लष्करी व्यवस्थापन आणि गनिमी कावा

एकूण ४०५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन सुरवाडे यांच्यासह संकेत कपले, मयूर पाटील, सनत जैन, प्रवीण राठोड, मनीष महाजन, तेजस सापधरे, वैभव इंगळे, रूपेश कोळी, विश्वजित देशमुख, अनिल गवते आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्याला चालना मिळून शिवचरित्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मुक्ताईनगरात शिवजयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा बौद्धिक उपक्रम विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button