महाराष्ट्रसामाजिक
जि.प मराठी प्राथमिक शाळा हिंगणा कवठळ येथे माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती अती उत्साहात सपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की, आपण हरवर्षी फेब्रुवारी हा दिवस माता रमाई आंबेडकर जयंती दिवस म्हणून साजरा करीत असतो. त्याच परंपरेनुसार या वर्षी सुद्धा हिंगणा कवठळ येथे माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती जि प मराठी प्राथमिक शाळा येथे साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या सुरवातीला हिंगणा कवळळ येथील जिप मराठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री डोसे सर आणि हिंगणा गावचे प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते श्री मुंकुदा गव्हांदे यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डोसे सर यांनी केले . आपल्या प्रास्ताविक पर भाषणात डोसेसर यांनी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या त्यागाचा आणि संघर्षाचा उल्लेख करून मानवी समाजातील प्रत्येक स्त्रीने रमाबाई आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा असे संबोधित केले . कार्यकमाचे सुत्रसंचालन वरवट खंडेराव येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश दामोदर यांनी केले तर आभार प्रदर्शन रतन भगत यांनी केले
✍️



