नांदवेल शिवारात अपघाती मानपुर येथील पोलीस पाटील यांचा अपघाती मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यात हळहळ व्यक्त
| प्रतिनिधी मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेल गावाच्या शिवारात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पोलीस पाटील (मानपुर) अपघात झाले असून मुकेश आनंदा तायडे (वय ३८ वर्षे) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने मुक्ताईनगर तालुक्यातील मानपुर गावांमध्ये शोक काळा पसरलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास नांदवेल गावाचे पोलीस पाटील अनिल समाधान यांनी माहिती दिली की, गावातल्या असलेल्या शेत शिवारात गेले होते. दरम्यान, गावापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एक मयत इसम आढळून आलेला आहे. त्यांचे अपघातात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात वाहनाने त्यांना ठोकले असावे असा अंदाज व्यक्त केला आहे. आणि त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.काही वेळानंतर मुकेश तायडे घरी परत न आल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. शोधादरम्यान त्यांचा मृतदेह नांदवेल रस्त्याच्या कडेला घटनेची आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सदर घटनेची जनरल डायरी क्रमांक ०१३ नुसार नोंद करण्यात आली असून अपघाती मृत्यू (अ.म. रजि.) म्हणून प्रकरण दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मुकेश तायडे हे मनमिळावू स्वभावाचे असून कुटुंबाचा आधार होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



