जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिकसांस्कृतिक

आई वडिलांचे कष्ट कधीही विसरू नकाऍड रोहिणीताई खडसे- खेवलकर यांचं दहावी च्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन:-

आई वडिलांचे कष्ट कधीही विसरू नकाऍड रोहिणीताई खडसे- खेवलकर यांचं दहावी च्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन:- (तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)
सविस्तर वृत्त असे की नुकताच जे स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला आजचा निरोप समारंभाचा हा क्षण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी असून
हा निरोप “दुरावण्याचा” नाही… तर उच्च ध्येयाकडे झेप घेण्यासाठीच्या गुरुजनांकडून शुभेच्छा आहेत. ग्रामीण भागात जन्म घेणे ही कोणतीही मर्यादा नाही, उलट ते एक मोठे सामर्थ्य आहे.कारण ग्रामीण विद्यार्थी संघर्षातून घडतो…तो कष्ट करतो, वेळेची किंमत जाणतो, आणि परिस्थितीशी झुंज देत पुढे जातो.या तुमच्या जडणघडणीत तुमच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा असतो, त्यामुळे भविष्यात कितीही मोठे झालात, तरी आई वडिलांचे कष्ट कधीही विसरू नका, ” असे भावनिक आवाहन ऍड रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी मुक्ताईनगर येथे केले.
जे.ई.स्कूल मुक्ताईनगर येथे इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी चे सचिव डॉ. सी. एस.चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन ॲड. रोहिणीताई खडसे- खेवलकर,उपाध्यक्ष नारायणराव चौधरी, संचालक रमेशभाऊ खाचणे,पुरुषोत्तम महाजन,महेश पाटील, प्राचार्य विकास चौधरी, उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेच्या आठवणी, प्रसंग, आपल्या शालेय जीवनाची सुरवात सांगून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.तसेच शाळा, प्राचार्य व शिक्षक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रसंगी सौ.रोहिणीताई यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की,” आयुष्यात यश हे अचानक मिळत नाही.यश हे दररोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी तयार होतं.आज अभ्यास केला नाही तर उद्या अडचण येते.आज वेळ वाया घालवला तर उद्या संधी हातातून जाते.आज शिस्त पाळली तर उद्या आयुष्य आपोआप शिस्तीत येतं
सातत्य हा यशाचा खरा मित्र आहे.आजच्या काळात मोबाईल गरजेचा आहे… पण त्याचा गैरवापर तुमचं भविष्य संपवू शकतो.
मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी करा
ऑनलाईन व्हिडिओ/नोट्स/टेस्ट—यासाठी मोबाईल वापरा
पण गेम, रील्स, चुकीची संगत… यापासून दूर राहा तुमचा वेळ म्हणजे तुमचं भविष्य आहे.परीक्षेला घाबरू नका—परीक्षा तुमची क्षमता तपासते.दहावीची परीक्षा तुमच्या जीवनातील पहिली मोठी पायरी आहे.योग्य नियोजन,रोजचा अभ्यास,सराव पेपर,वेळेचेव्यवस्थापन,आत्मविश्वास हे पाच गुण पाळले, तर यश नक्कीच मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्याध्यापक श्री व्ही.एम. चौधरी यांनी तणाव मुक्त होऊन परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापिका श्रीमती. व्ही.के.शिर्के यांनी परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली.
कार्यक्रमानंतर अल्पोपहार साठी उपशिक्षक एस एम वाढे, एस आर ठाकुर यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांसह ठेका धरत सर्व वर्ग शिक्षक बंधू भगिनींनी आणि शिक्षकेतर बंधूनी विद्यार्थ्यांना आनंदाने निरोप दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.पी. एस. बढे.मॅडम यांनी तर आभार डी एम न्हाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button