जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस तीन एकाच दिवसात तीन जणांना चावा नगरपंचायतीकडून मात्र निगरगट्टपणा?

मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर मध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छादन वाढला एकाच दिवसात तीन जणांना चावा नगरपंचायतीकडून मात्र उपयोजना शून्य?

शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छादन वाढला असून रस्त्याने ये जा करणारा नागरिकांवरती तसेच मोटर शाळे करून विद्यार्थी शाळेत जात असताना सायकलवरून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.

विद्यार्थ्यांना देखील आपला जीव मुठीत घेऊन गावामध्ये क्लास साठी व शाळेसाठी जात असताना मोकाट कुत्र्यांचा त्यांच्यावरती हमला होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे. असे असून यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे? कालच संताजी नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका अल्पवयीन मुलासह दोन नागरिकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून मिळाली.

कुत्रे पकडण्याचे टेंडर झाले नसल्याची माहिती

मोकाट कुत्र्यांचे टेंडर मुक्ताईनगर पंचायतीच्या माध्यमातून काढण्यात येते परंतु यावर्षी कुठल्याही प्रकारचं मोकाट कुत्र्यांचा टेंडर काढल्याने मोकाट कुत्र्यांचे लोकांवरती आक्रमक पद्धतीने हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

टेंडर संदर्भात अधिकारी यांच्याशी माहिती घेतली असता कुत्रे पकडण्याचे टेंडर निघाले नसल्यामुळे संबंधित व्यक्तीचे बिल निघत नसल्यामुळे कुत्रे पकडला कोणी तयार नाही?
एखाद्याचा जीव गेल्यावर नगरपंचायत प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न मुक्ताईनगर शहरातील नागरिक विचारून लागलेले आहे.

मुक्ताईनगर येथील नागरिकांचा जीव का स्वस्त आहे असा चर्चा जोर धरत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button