बुलढाणा

त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी .अशी मागणी करताना चे निवेदन देताना सुजित बांगर व त्यांचे सहकारी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी संग्रामपूर,

रतन भगत.

      सविस्तर वृत्त असे की ,आतापर्यंत समाजामध्ये देशांमध्ये किंवा जगामध्ये जेही कोणी व्यक्ती मोठी झाली असेल किंवा त्या व्यक्तीने आपले नाव कोणत्या ना कोणत्या  क्षेत्रांमध्ये लौकिक केले असेल त्या व्यक्तीच्या मागे स्त्रीचे योगदान लाख मोलाचे ठरलेले आहे. असेच एक त्यातील अत्यंत जिवंत मोलाचे योगदान म्हणजे माता रमाईचे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामध्ये माता रमाईचा फार मोठा वाटा आहे. माता रमाईचा त्याग आणि संघर्ष हा जनसामान्यात पोहोचावा याकरिता शासकीय स्तरावरून त्यांची जयंती ही साजरी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांनी दोन फेब्रुवारी 2026 रोजी संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना एका निवेदनाद्वारे देऊन मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे. महामानव विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई भिमराव आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडींमध्ये फार मोलाचा व सिंहाचा वाटा आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागातून आणि संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव आपल्याला लाभले आहेत .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामध्ये माता रमाईचा फार मोलाचा असा वाटा आहे. रमाईचा त्याग आणि संघर्ष हा जनसामान्यात पोहोचावा याकरिता शासकीय स्तरातून त्यांची जयंती साजरी करण्यात यावी .दरवर्षी समस्त बहुजन समाज हा 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करीत असतो .परंतु शासकीय स्तरावर अधिकृत रीत्या ही जयंती साजरी होत नाही. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती ही शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थी व जनसामान्यांमध्ये माता रमाईचा आदर्श आणि त्याग व समर्पणाची भावना ही देशाच्या जडणघडण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी व आपल्या परिवारासाठी कष्ट करून आपला आदर्श निर्माण करणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई  चा इतिहास यानिमित्ताने जगासमोर येईल. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी सुजित बांगर, पंकज शेगोकार, अरुण निंबोळकर, रज्जाक सुरत्ने, अकबर सुरत्ने, विकास खंडेराव, गौरम राव वानखडे, प्रकाश डोंगरदिवे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 
  

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button