बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

धानोरा महासिध्द येथे आजपासून यात्रा महोत्सवप्रतिनिधी.राजेंद्र मुंडेवडगाव गड : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्री महासिध्द महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या श्री क्षेत्र धानोरा या गावी पुरातन काळापासून माघ शुध्द दांडी पौर्णिमेला यात्रा भरते.

यावर्षी या यात्रेला रविवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक राष्ट्रीय एकात्मता ठेवून आनंद लुटतात. यात्रा महोत्सवात भाविक मोठ्या प्रमाणात येवून यात्रेतील विविध व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धानोरा महासिध्दं नगरीत या उत्सवाला भाविकांची मांदियाळी असते.

यात्रेच्या पहिल्या दिवशी नवस फेडणाऱ्यांची गर्दी असते. या दिवशी श्री महासिध्द महाराजांच्या पादुकांची मिरवणूक टाळ मृदंगाच्या निनादात व

हरिनामाच्या गजरात काढली जाते. त्यानंतर हभप गुरूवर्य महाराज तुकाराम सखारामपुरकर यांचे काल्याचे किर्तनाने श्री महासिध्द महाराज संस्थान धानोरा येथे यात्रेनिमित्त सुरू असलेल्या सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व नामसंकीर्तन सप्ताहाची सांगता होवून महाप्रसादाचे वितरण होणार आहे. तरी भाविकांनी किर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महासिध्द संस्थान यांच्यावतीने करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button