बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी पंधराव्या वित्त आयोगाचा तब्बल एक कोटी 57 लाख,40 हजाराचा निधी प्राप्त!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर प्रतिनिधी,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की,
बुलढाणा जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी 15 वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील एकूण 24 कोटी 64 लाख 18 हजार 653 रुपयाचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून यापैकी संग्रामपूर तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींना एक कोटी 57 लाख 40 हजार 824 रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी हा येत्या दोन महिन्यातच खर्च करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ही पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना निधी प्राप्त झाला असून सदर कामाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत .नागरिकांना व समाजाला विकासात्मक कामासाठी फायदा व्हावा अशी या निधीतून अपेक्षा आहे .हा निधी सदर ग्रामपंचायतींना मिळत असल्यामुळे विकास होऊन विकासात्मक बाबींसाठी होणाऱ्या खर्चाचा हिशोब ठेवावा लागणार आहे. मागील चौदाव्या वित्त आयोगाचा खर्च अजूनही काही ग्रामपंचायतीने दिलेला नसल्याचे नमूद केले गेले आहे. सदर निधी हा येत्या दोन महिन्यातच खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .संग्रामपूर पंचायत समितीचे अंतर्गत 50 ग्रामपंचायतींना मिळालेला एक कोटी 57 लाख 40 हजार 824 रुपये निधी संबंधित ग्रामपंचायतीने मुदतीच्या आत खर्च करावा असे वरिष्ठांचे आदेशानुसार संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी अर्थात सचिव यांना दिले आहेत .तरी हा जो संग्रामपूर तालुक्यासाठी जो निधी प्राप्त झालेला आहे .हा संबंधित ग्रामपंचायती च्या सचिवांनी हा निधी जनतेच्या विकासासाठीच खर्च करावा अशी अपेक्षा.



