बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
संग्रामपूर तालुक्यातील केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वरवट खंडेराव येथे मा जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न!

स्टार भारत एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 12/1/2026 रोजी संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमाता जिजाऊ जयंती संग्रामपूर तालुक्यातील केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वरवट खंडेराव येथे मोठ्या आनंदाने संपन्न झाली. त्यावेळी वरवट खंडेराव येथील शाळा केंद्रप्रमुख श्री दिनेश तायडे सर, प्रमोद काळे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका हरणे मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंता भाऊ गाळकर, सुरेश वरटकारआणि सतीश कापसे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊंच्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .आणि त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश तायडे सर यांनी केले तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंता भाऊ गाळकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश वरटकार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष वसंता भाऊ गाळकर यांनी शाळेच्या संबंधित सर्व काही माहिती दिली .तसेच सतीश कापसे यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
तसेच अंगणवाडी सेविका इंगळे मॅडम सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.



