बुलढाणामहाराष्ट्र
शेगाव रोकडीया नगर मधील १५ वर्षीय मुलगा बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगावः येथील रोकडीया नगर भागातील १५ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुलाची आई सौ. भाग्यश्री रामदास गोंडचवर रा. रोकडीया नगर शेगाव यांनी शहर पोस्टेला फिर्याद दिली की, त्यांचा मुलगा गणेश रामदास गोंडचवर हा २ जानेवारी रोजी जुन्या पॅन्टवर शिलाई मारून आणतो असे सांगून सायकलने घरून निघून गेला. बराच वेळ होवूनही तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा परिसरात शोध घेतला परंतु मिळून आला नाही. त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. या फिर्यादवरुन पोलिसांनी कलम १३७(२) नुसार नोंद केली असून सदर मुलगा कोणालाही दिसून आल्यास व पो. नि. निमिष मेहेत्रे मो.९४२२६१४८८६ व पो. ना. निलेश गाडगे यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे



