गुन्हेगारीजळगावा जिल्हा

विश्वासघात करून तब्बल 2.07 लाखांचा माल अपहार; मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल


मुक्ताईनगर :
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 421/2025 अन्वये बी.एन.एस. कलम 316 (2) प्रमाणे गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खासगी लॉजिस्टिक कंपनीच्या चालकाने विश्वासाचा गैरवापर करून कंपनीच्या मालाचा अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अक्षीत विनयकुमार पांडे (वय 30, व्यवसाय – खाजगी नोकरी, डेप्युटी मॅनेजर, संधु ट्रान्स लॉजिस्टिक इंडिया प्रा. लि., रा. प्लॉट नं. 67, लक्ष्मीनगर, नवी दिल्ली) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अमितसिंग विरंदरसिंग (वय 45, रा. भगवानदिन का पुरबा, घुराडीह, अमावा, रायबरेली, उत्तर प्रदेश) हा त्यांच्या कंपनीत चालक म्हणून कार्यरत होता.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संधु ट्रान्स लॉजिस्टिक कंपनीने आरोपीवर विश्वास ठेवून कंटेनर क्रमांक NL 01 AJ 8685 मधून अपोलो कंपनीचे एकूण 399 टायर, फ्लॅप व ट्यूब असा सुमारे 69,91,997 रुपयांचा माल चेन्नई येथून इंदौर येथे पोहोचविण्यासाठी त्याच्या ताब्यात दिला होता. मात्र, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजेपासून ते 18 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान, प्रवासादरम्यान आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या मालातून
14 ट्रक टायर (किंमत – ₹1,91,360/-)
14 फ्लॅप (किंमत – ₹11,494/-)
14 ट्यूब (किंमत – ₹4,186/-)
असा एकूण ₹2,07,040/- रुपयांचा माल अपहार केल्याचा आरोप आहे.
अपहार केल्यानंतर आरोपीने संबंधित कंटेनर घोडसगाव येथील बाबा रामदेव ढाबा, ता. मुक्ताईनगर येथे ढाब्याच्या आवारात उभा करून तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्याची दखल घेत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम 316 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक आशिष असरजी आडसुळ यांच्या आदेशाने पोहेकॉ 2657 अजय खंडेराव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button