क्राईमखानदेशजळगावा जिल्हामुक्ताईनगर

सावधान! ‘एक लाखाच्या बदल्यात १० लाख’ देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई


मुक्ताईनगर (जि. जळगाव) — समाजमाध्यमांवरून “एक लाख रुपयांत दहा लाख रुपये मिळतील” असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून बनावट नोटांचा मोठा साठा व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या कुन्हा दुरक्षेत्र अंतर्गत मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जॉधनखेडा, चारठाणा आदी गावांतील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी फेसबुक व इतर समाजमाध्यमांवरून आर्थिक प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारित केले होते. या व्हिडीओंमध्ये एक लाख रुपयांच्या मोबदल्यात दहा लाख रुपये, सोन्याच्या विटा, नाणी, काळी हळद, रेड मर्क्युरी, नागमणी आदी देण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. या आमिषाला बळी पडलेल्या देशातील विविध भागांतील नागरिकांना संबंधित भागात बोलावून त्यांना मारहाण करून रोख रक्कम व साहित्य लुटल्याचे प्रकार उघडकीस आले होते.
या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांनी विशेष आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हिडीओंचा शोध सुरू केला.
दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी “Saawariya Set” या फेसबुक प्रोफाइलवरून २८ सेकंदांचा एक व्हिडीओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. या व्हिडीओमध्ये “एक लाख का दस लाख मिलेगा, जिसे खरीदना है वही कॉल कीजिए” असे आमिष दाखवण्यात आले होते. व्हिडीओमध्ये नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास केला असता, लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथील
१) शिवकुमार शमी भोसले,
२) देवकुमार शिवराज भोसले
आणि
३) सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले
यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ४२०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ६२, ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींच्या ताब्यातून “CHILDREN BANK OF INDIA – पाचशे रुपये” असे लिहिलेल्या एकूण १०६५ बनावट कागदी नोटा तसेच ५ अँड्रॉईड मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. आशिष आडसूळ, सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र चाटे, पोलीस उपनिरीक्षक श्री. नयन पाटील व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button