मलकापूरमहाराष्ट्र

रेती माफियांवर प्रशासनाचा जोरदार घाव; कोटेश्वर–जमनापुरी घाटात धडक कारवाई, ८ टिप्पर जप्त

मलकापूर : अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या रेती माफियांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ठीक १० वाजता कोटेश्वर–जमनापुरी घाट, मौजा नरवेल येथे महसूल व पोलीस विभागाने संयुक्त धडक कारवाई करत रेतीने भरलेले तब्बल आठ टिप्पर पकडले. या जप्त कारवाईची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपये असल्याची माहिती आहे.

मा. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या स्पष्ट आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी मलकापूर श्री. संतोष शिंदे यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. तहसीलदार मलकापूर श्री. समाधान सोनवणे यांनी मलकापूर शहरचे ठाणेदार श्री. गिरी साहेब यांच्यासोबत थेट मैदानात उतरून रेती माफियांची मुस्कटदाबी केली.

या कारवाईत नायब तहसीलदार श्री. प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी मलकापूर श्री. कुलवंतसिंग राजपूत, मंडळ अधिकारी धरणगाव श्री. व्ही. एन. कोल्हे, तलाठी श्री. धीरज जाधव (मलकापूर), श्री. राहुल खर्चे (दसरखेड), महसूल सेवक श्री. पंकज जाधव, श्री. सचिन चोपडे तसेच पोलीस आरसीबी पथक सहभागी झाले होते.

नदी, घाट व पर्यावरणाची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने आता ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबले असून, अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा या धडक कारवाईतून देण्यात आला आहे. रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही, असा कडक संदेश प्रशासनाने दिला आहे.

या धडक कारवाईदरम्यान अवैध रेती वाहतूक करणारे एकूण ८ टिप्पर जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये खालील वाहनांचा समावेश आहे —
MH 28 BB 4172
MH 28 BB 7935
MH 28 BB 8910
MH 28 BB 2895
MH 28 BB 6174
MH 28 BB 7397
MH 28 BB 4414
MH 28 BB 1210
सदर सर्व टिप्पर हे रेतीने भरलेले असून, प्राथमिक चौकशीत अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित वाहनचालक व मालकांविरोधात महसूल व खनिज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button