बुलढाणामहाराष्ट्र

मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिका चा मनमानी कारभार !

मलकापूर – दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेताच्या ७/१२ मधे मक्याची नोंद करून मिळण्याचा अर्ज दाखल करण्याकरिता सुरेखा विकास कुयटे रा खामखेड हे अर्जदार कार्यालयातील लिपिक नारखेडे यांच्याकडे गेले असता हा अर्ज तुम्हाला कोणी लिहून दिला? त्यांना माझ्यासमोर हजर करा! असे लिपिकाने सुनावले त्यानुसार अर्जदाराने संबंधित अर्जनवीस ( वेंडर ) यांना लिपिकाकडे नेले असता तुम्ही हा अर्ज कसा लिहिला ?तुम्हाला अर्ज लिहिण्याचा अनुभव नाही का ?शेतात पिकाची नोंद ची प्रकरणे आमचे कोर्टात चालतात का ?आम्हाला एकच काम आहे का? नुसते कागदं जमा करायचे का? कार्यालयात नुसती कागदांची भरती करायची का? माझ्यावर कामाचा खूप ताण आहे ! अशा प्रकारचे शुल्लक अर्ज यापुढे माझ्याकडे पाठवू नये ! असा अर्ज नवीस यांना दम दिला. व पाठविल्यास तुम्हाला कार्यालयाच्या आवारात बसण्यावर गदा अनेल अशा शब्दात धमकावले यावरून हे स्पष्ट होते की उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर येथे लिपिकाचा मनमानी कारभार कशा प्रकारे सुरू आहे दैनंदिन येणारी अर्ज न घेणे व कामाचा ताण असल्याचे भासवून सामान्य अर्जदारास व अर्जनवीस यांना धमकावणे ही कामे सरकारी कार्यालयात चालतात, सामान्य जनतेला अर्ज दाखल करण्यास मनाई करण्यात आल्यास त्यांनी दाद कुणाकडे मागावी? शासकीय नियमानुसार कोणत्याही सामान्य नागरिकाला शासकीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यास मनाई करण्यात येऊ शकते का ? असा कोणता शासकीय नियम आहे का? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे याबाबत अर्ज दाखल करून न घेणाऱ्या लिपिकावर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये अशी चर्चा जनतेत रंगली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button