जळगावा जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता आणि ई-केवायसी संदर्भात महत्त्वाचे अपडेट.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता आणि ई-केवायसी संदर्भात महत्त्वाचे अपडेट.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला भगिनींसाठी नोव्हेंबर महिन्याच्या १७ व्या हप्त्याबद्दल आणि ई-केवायसी (e-KYC) संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अनेक महिला लाभार्थी ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे चिंतेत होत्या.१७ वा हप्ता: ई-केवायसीची गरज नाही!

पात्र महिला भगिनींसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता मिळवण्यासाठी तसेच डिसेंबर महिन्याचा १८ वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक नाही. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी अजूनही बाकी आहे, त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रति हप्ता ₹१५०० रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.ई-केवायसीची अंतिम तारीख आणि गरज.

तरीही, ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता न चुकता आपल्या बँक खात्यामध्ये हवा असेल, त्यांच्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. या तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांना आपली ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.ई-केवायसी कशी करावी?ई-केवायसी प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि ती आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण करता येते. यासाठी योग्य माहितीचा व्हिडिओ पाहून तुम्ही अचूकपणे ई-केवायसी पूर्ण करू शकता. त्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button