बुलढाणामहाराष्ट्र
कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पैसे बाकीच?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
रतन भगत.
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी.
कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पैसे देण्यात यावे, यासाठी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी साहेब यांना निवेदन!
सविस्तर वृत्त असे की ,मागील काही वर्षांमध्ये कोरोना ही महाभयंकर महामारी येऊन गेलेली आहे. मात्र यामध्ये जगातील हजारो डॉक्टर्स ,नर्स ,आणि संबंधित आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी वर्ग यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोलाची कामगिरी पार पाडली आहे. आणि या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे बऱ्याच लोकांचे प्राण सुद्धा वाचले आहेत. अशा या कोरोना संकटाच्या वेळी आपल्या जीवाची आणि आपल्या मुलाबाळांची आणि कुटुंबाची कसलीही परवा न करता ,आपल्या बुलढाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घरोघरी ,गल्लोगल्ली जाऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीची आणि घटकाच्या आरोग्याची काळजी घेतली. यामध्ये बऱ्याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा या अंगणवाडी कर्मचाऱ्या ंच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या बाबींकडे विशेष असे लक्ष देऊन आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पैशाच्या स्वरूपात तात्काळ मोबदला देण्यात यावा. असे निवेदन बुलढाणा जिल्ह्याच्या अंगणवाडी युनियन कर्मचारी आणि संग्रामपूर तालुक्याच्या अंगणवाडी युनियन अध्यक्षा सौ बोपले मॅडम यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी साहेब,महिला व बाल कल्याण विभाग बुलढाणा यांना दिले.
✍️



