प.पु.श्री संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाची भक्ती भावपूर्ण वातावरणात सांगता शिवसेना

तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती !
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अटाळी येथील सद्गुरु श्री संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाची आज भक्तीभावपूर्ण वातावरणात सांगता झाली.
दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, नामस्मरण, तसेच प्रख्यात कीर्तनकारांचा भक्तिरसाने संपूर्ण परिसर भक्तीभाव पूर्ण वातावरणात लीन झाला होता.
काल महोत्सवाच्या समारोप प्रसंगी श्री क्षेत्र अटाळी येथे संत भोजने महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे अप्रतिम दर्शन घडले. ग्रामस्थ आणि सेवेकरी भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून उत्कृष्ट सेवा बजावली.
भोजने महाराजांच्या चरणी कोट्यवधी भाविकांचा अखंड विश्वास आणि भक्तिभाव असाच कायम राहो, हीच प्रार्थना. यावेळी संस्थांचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कामगार मंत्री पालकमंत्री अकोला मा.ना.श्री आकाश दादा फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित ऍड अमोल भाऊ अंधारे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजेंद्र बघे, भाजपा तालुकाध्यक्ष श्याम भाऊ पाटेखेडे, शिवसेना शहर प्रमुख चेतन भाऊ ठोंबरे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख, महिला आघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाळे, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख श्वेता ताई पाटील, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक निर्मलाताई उर्फ आजी हेलोडे, श्री पवनभाऊ माळवंदे, पिंटू भाऊ धोरण, बजरंगी ज्ञानेश्वर भाऊ शेगोकार, सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर, शिवसेना उप तालुकाप्रमुख योगेश बापू देशमुख, सोशल मीडिया तालुकाप्रमुख भूषण दुतोंडे, विभाग प्रमुख गणेश ढगे, शिवसेना उपशहर प्रमुख करण छापरवाल, बजरंगी आशिष भाऊ लांडगे, अभिषेक भाऊ थोरात, शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप बघे, महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



