अपघातजळगावा जिल्हा

“महामार्गावर थरारक अपघात! सालबर्डी फाट्याजवळ ट्रक पुलावरून कोसळला, चालक बचावला”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी.

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी फाट्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला. झोपेच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडक देत थेट पुलावरून खाली पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अंकित कल्लू मेहंदोले (वय २४, रा. राजना, मध्य प्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव असून, त्याने चालवित असलेला ट्रक (क्र. एमएच-४० सीएम-५३१४) हा लोखंडी पोलचा माल घेऊन जात होता.२५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास सालबर्डी फाट्याजवळ आल्यानंतर चालकाला झोपेची डुलकी लागली. परिणामी ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या कठड्याला धडक देत खाली कोसळला.अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला मुक्का मार लागल्याची माहिती मिळाली आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.२५ ऑक्टोबर रोजी उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती, अशी माहिती मिळाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button