रावेर रेल्वे स्थानकाजवळ दुर्दैवी अपघात — उत्तर प्रदेशातील प्रवाशाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर प्रतिनिधी विकास आमोदकर रावेर (ता. रावेर) येथील रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी राजेंद्र कुमार निकम (वय अंदाजे ५० वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास मुंबई–कानपूर एक्सप्रेस रेल्वे रावेर स्थानकाजवळून सुटत असताना राजेंद्र कुमार निकम हे झोपेतून उठून बाथरूमकडे जात असताना अचानक तोल जाऊन खाली पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रावेर येथील समाजसेवक रवी भाऊ पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत नेऊन रवी पाटील व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत व्यक्तीसोबत त्यांचे नातेवाईक नितीन कुमार निकम, मंटु निकम, अनिकेत निकम, अनुज निकम हे सोबत होते.
या प्रसंगी रवी भाऊ पाटील, प्रमोद रामदास महाजन, सुनिल दिलीप कोळी, योगेश कमलाकर महाजन, सनी रामकृष्ण महाजन, विशाल गणेश पाटील, चेतन सुभाष पाटील, ईश्वर संतोष महाजन, मोहीत चंद्रकांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
या घटनेमुळे रावेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



