श्री.संभाजी धुमक यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार जाहीर

ठाणे : (सचिन शेलवले ) अल हिदाया रेन्सिडेयल स्कूल बदलापूर सहाय्यक शिक्षक श्री संभाजी धुमक यांना साहित्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.
दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी साहित्यरत्न सन्मान सोहळा हरि प्रिया मल्टीपर्पज हॉल माधवनगर मिरज रोड चाणक्य चौक अहिल्यादेवी होळकर स्मारक जवळ सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून खासदार विशालदादा पाटील तर प्रमुख पाहणे म्हणून विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवटी, माजी आमदार विक्रमदादा सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.या सर्वांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री.संभाजी धुमक हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात विविध उपक्रम राबवतात.हे उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट कलाकार,सूत्रसंचालक,वक्ते आहेत.विविध नाटकांमध्ये सुद्धा सुंदर अभिनय सादर केलेले आहेत,वक्ते म्हणून विविध ठिकाणी मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे,अनेक लेख लिहलेले आहेत,अनेक संस्थांनी सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे.
श्री.संभाजी धुमक यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन चेअरमन आकीब सर,मुख्याध्यापक फराज सर,सहकारी शिक्षक उमेश मानकापे सर,आणि इतर सर्व शिक्षक,मित्रपरिवार व इतर मान्यवरांनी केले आहे.



