बुलढाणाविदर्भ

वरवट ( खंडेराव) येथे गुड मॉर्निंग पथकाची गरज!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 

रतन भगत.

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी.

सविस्तर वृत्त असे की, संग्रामपूर तालुक्यातील वरवट( खंडेराव )येथे गावांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना बऱ्याचशा साथीच्या रोगांना बळी पडावे लागत आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे गावात महात्मा गांधी स्वच्छता अभियान हे फक्त कागदापुरतेच मर्यादित आहे. कारण शासनाने सर्व गावातील लोकांना शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता 12 हजार रुपये दिलेले आहेत .तरीसुद्धा गावातील बरेचसे नागरिक आणि स्त्रिया ह्या गावाच्या तिन्ही चारही दिशांना उघड्यावर सोचास बसण्यास जात आहेत. त्यामुळे त्या परिसरातील लोकांच्या आरोग्यास व जीवितास फार मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे .यासाठी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत सचिवाकडे लेखी स्वरूपात अर्ज देखील केला होता .परंतु त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली दिसत नाही .त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. यासाठी शासनाने या बाबींकडे विशेष असे लक्ष देऊन संग्रामपूर तालुक्यातील वरवट (खंडेराव) येथे गुड मॉर्निंग पथक द्यावे .अशी संपूर्ण गावची तीव्र मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button