Uncategorizedबुलढाणाविदर्भ

स्वर्गीय श्रीराम काकडे यांच्या निमित्त भावनिक कीर्तनसोहळा – भगवंताच्या नामस्मरणात दाटला आठवांचा सागरबोरगाव

(ता. चिखली)प्रतिनिधी आरुणा खंडागळे येथे __शनिवार रोजी स्वर्गीय श्रीराम काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक भावस्पर्शी कीर्तन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या सुपुत्र विष्णू काकडे यांनी केले होते. पुण्यस्मरणाच्या या पवित्र प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत जुगलबंदी कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर (तालुका भोकरदन) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

गावकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय असून, सर्व उपस्थितांनी भक्तिभावाने कीर्तनाचा आस्वाद घेतला. स्वर्गीय श्रीराम काकडे यांचे स्मरण करताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांच्या कार्याची आठवण करून देत भक्तीमय वातावरणात संपूर्ण गाव एकवटले होते.

ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांनी आपल्या कीर्तनातून व्यसनमुक्ती, संस्कार, भगवंताचे नामस्मरण आणि जीवनमूल्यांवर अत्यंत प्रभावीपणे भाष्य केले. “वैकुंठवासी झालेला माणूस हा देवरूप असतो, त्याचा आत्मा कधीच नाश पावत नाही” या विचारांवर त्यांनी प्रकाश टाकत श्रद्धा आणि भक्तीचा संदेश दिला.

या सोहळ्यातून एक भावनिक अनुभव सर्व गावकऱ्यांना मिळाला. स्वर्गीय श्रीराम काकडे यांचे कार्य, स्वभाव व आठवणींनी भारावलेली ही संध्याकाळ त्यांच्या स्मृतीस वंदन करणारी ठरली.

कार्यक्रमाच्या शेवटी, काकडे कुटुंबीयांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि पुढेही सामाजिक कार्यात सातत्य ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button