Uncategorizedजळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भ
संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा येथे 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
रतन भगत.
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी.
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 2/10/ 2025 रोजी संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा येथे 69 वा धम्मचक्र साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले आणि सुरुवातीला सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून प्रज्ञा व समता स्थापन करण्याचे आश्वासन जनतेने दिले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंदा गव्हांदे, तसेच हिंगणा येथील नमो बुद्धाय बौद्ध पंच महिला मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव मुकिंदा गव्हांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश उमाळे यांनी केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयुष्यमान प्रकाश दांडगे हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला सुरेश उमाळे, श्रीपत उमाळे ,मधुकर उमाळे ,दिनेश चोपडे ,दिलीप शेगोकार नागेश उमाळे, कृष्णा उमाळे ,भीमराव शिरसाट ,प्रकाश दांडगे आणि समस्त हिंगणा गावकरी मंडळी व समाज बांधव ही उपस्थित होते. सदर कार्यक्रम शांततेत पार पडला.



