बुलढाणामहाराष्ट्र
वकील संघ संग्रामपुर ,तालुका संग्रामपुर, जिल्हा बुलढाणा यांची नवीन कार्यकारिणी गठीत!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
रतन भगत,
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर.
सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक 30 /9/ 2025 ला वकील संघाची बैठक मावळते अध्यक्ष ऍड. एन. सी. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर कार्यकारणी मध्ये आज रोजी अध्यक्षपदी ऍड. एम. एस. कीर्तने, तर उपाध्यक्षपदी ऍड. टी .ए . बेग व सचिव पदी ऍड. व्ही.पी .वानखडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
तसेच सदर बैठकीस वकील संघाचे मावळते अध्यक्ष ऍड. एन. सी. वाघ तसेच वकील संघाचे जेष्ठ सदस्य ऍड .गावंडे साहेब ,ऍड. एम .ओ .इंगळे साहेब ,ऍड .घोडेस्वार साहेब , ऍड.राठी साहेब , ऍड.गिरजापुरे साहेब, ऍड. क्षीरसागर साहेब , ऍड.बावस्कर साहेब, ऍड .खंडेराव साहेब ,ऍड .घाटे साहेब ,ऍड. कुरवाडे साहेब, ऍड. सातव मॅडम, ऍड. गायकी साहेब, ऍड. गव्हांदे साहेब, ऍड. बावणे साहेब ,ऍड .अग्रवाल साहेब ,ऍड .भोंडे मॅडम ,ऍड.अमीर साहेब ,ऍड .तायडे साहेब , ऍड .खान मॅडम हे उपस्थित होते .सदर बैठकीत वरील वकिलांच्या उपस्थितीत वकील संघ संग्रामपूर यांची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.



