शिवसेनेचे चिखली तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

चिखली | २९ सप्टेंबर २०२५ (सोमवार)
प्रतिनिधी चिखली = अरुणा खंडागळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चिखली तहसील कार्यालयासमोर आज दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख मा. प्रा. नरूभाऊ खेडेकर यांच्या आदेशाने, जिल्हा प्रमुख मा. जालींधरजी बुधवत यांच्या उपस्थितीत, तसेच चिखली तालुका प्रमुख श्री किसनराव धोंडगे पाटील आणि उपजिल्हा प्रमुख श्री विलासजी सुरडकर यांच्या नेतृत्वात पार पडले.
या आंदोलनात अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मा. प्रा. नरूभाऊ खेडेकर (जिल्हा संपर्कप्रमुख), मा. जालींधरजी बुधवत (जिल्हा प्रमुख), डि.एस. लहाने सर, उपजिल्हा प्रमुख श्री विलास सुरडकर, तालुका प्रमुख श्री किसनराव धोंडगे पाटील, नंदभाऊ कर्हाडे (जिल्हा प्रमुख, युवासेना), श्रीरामभाऊ झोरे (शहरप्रमुख), लखन गाडेकर (उपजिल्हा प्रमुख), गजानन पवार (तालुका प्रमुख, युवासेना), विजया ताई पाटील (म.आ. जिल्हा प्रमुख), वसंतराव झाल्टे (जिल्हा प्रमुख, किसान सेना), अरुणभाऊ अंबसकर (उपजिल्हा प्रमुख, किसान सेना), बी.टी. म्हस्के सर (समन्वयक, शिवसेना), विजय सोलंकी (माजी सरपंच) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
याशिवाय, विष्णूभाऊ मुरकुटे (तालुका संघटक), कौतीकराव जाधव, प्रदीप वाघ, अरुण सुरडकर, वसंता अंभोरे, सुनील रगड, सुभाष आटोळे, राजू भोसले, बंडुभाऊ जाधव, बाजीराव बापू, मनोज भुतेकर, विभाग प्रमुख राहुल मिसाळ, प्रविण सरदड, सागर शेळके, खुशालराव पडघान, गजानन कुठे, रवि पेटकर, बंटी कपूर, आनंद गैची, समाधान जाधव आदी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक प्रशासनाच्या प्रतिनिधींना निवेदन देखील देण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात यावेत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.



