खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ

चांगदेव महाराज शासकीय आयटीआय उचंदे येथे पदवी प्रदान सोहळा उत्साहात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

मुक्ताईनगर

चांगदेव महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उचंदे येथे नुकताच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पदवी प्रदान समारंभ थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव तर करण्यात आला, तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी दिशा व प्रेरणा देणारे मार्गदर्शनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयएमसी कमिटी सदस्य पुरुषोत्तम वंजारी यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्याच्या पुढील टप्प्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करून आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्रीकांत अरुण पाटील (मुक्ताईनगर) यांनी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या संधी, व्यवसाय क्षेत्रातील वाढत्या मागण्या तसेच कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले.

संस्थेत इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, पंप ऑपरेटर, मेकॅनिक, ड्रेस मेकिंग अशा विविध व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्राचार्य एम. बी. तायडे (आयएमसी सचिव) यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन आत्मविश्वासाने नव्या संधींचे स्वागत करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी प्रल्हाद निळे, एस. एम. गुरचळ, एच. डी. धायतडक, के. डी. नेमाडे, पी. एस. बावस्कर, एम. आर. लोखंडे यांसह संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकदिलाने सहकार्य केले. हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी केवळ गौरवाचा क्षण ठरला नाही, तर त्यांच्या भावी करिअरसाठी एक नवीन प्रेरणादायी टप्पाही ठरला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button