महाराष्ट्रसामाजिक

न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये ‘सामुहिक वाचन’ उपक्रम संपन्न

न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये ‘सामुहिक वाचन’ उपक्रम संपन्न
शेवगाव प्रतिनिधी/ लक्ष्मण साळुंके
दि. ०१.०१.२०२५ शेवगाव – येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमास झाली आहे. ग्रंथालय विभागामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवडा यात आज दि. ०१ जानेवारी २०२५ वार बुधवार रोजी सामुहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले. वाचनापासून दुरावत असलेल्या विद्यार्थ्यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी सहभाग घेतला व उपक्रमाचे कौतुक करून सर्वाना शुभेच्छा दिल्या. सामुहिक वाचन उक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, प्रा. डॉ. वसंत शेंडगे, प्रा. मिनाक्षी चक्रे, प्रा. अश्विनी गोरखे, प्रा. आशा वडणे, प्रा. संतोष उगलमुगले, प्रा. दत्तात्रय भुसारी, प्रा. सुशीलकुमार शिंदे, प्रा. सुधीर कापरे, प्रा. सचिन पवार व महविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी चक्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदू बर्डे, अयोध्या देवकर, प्रियांका वाघमारे याने परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button