आमरण उपोषण पाचव्या दिवशी तात्पुरते स्थगित !

न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार ; नरेंद्र सुईवाल. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा
दि.१४ सप्टें. | तेल्हारा येथील नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या शहरातील विकास कामकाजाच्या विरोधात नरेंद्र सुईवाल यांच्या चालू असलेल्या आमरण उपोषणाला पाचव्या दिवशी न.पा.प्र.चे प्रतिनिधी म्हणून मा.नरेंद्र बेंबरे अकोट , नगरपरिषद तेल्हारा चे अभियंता आकाश वाघ या प्रतिनिधींनी तेल्हारा येथील नरेंद्र सुईवाल यांच्या उपोषण स्थळाला शुक्रवार दि. १२ सप्टें. रोजी सायंकाळी भेट दिली. यामध्ये तेल्हारा पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले बाणेरकर साहेब यांनी मध्यस्थी करुन विशेष समन्वय घडवून आणला व अभियंता वाघ नगरपरिषद तेल्हारा यांचे चार ते पाच दिवसात आम्ही जिल्हास्तरावर दस्ताऐवज सादर करतो या आश्वासनावर तसेच तातडीने गंभीर मुद्द्यांवर बैठक सुद्धा आयोजीत होईल असे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण कर्ते नरेंद्र सुईवाल यांनी आपले चालू असलेले उपोषण त्वरीत तात्पुरते स्थगित केले . मात्र न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे नरेंद्र सुईवाल यांनी आमच्या तेल्हारा येथील प्रतिनिधींनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधला असता कळविले आहे.
बैठकी संदर्भात गंभीर मुद्द्यांवर लवकरच अकोला येथे सभा आयोजित होणार तसेच तब्येतीबाबत विचारणा केली असता प्रकृती ठीक असल्याचेही त्यांनी भ्रमणध्वनीवर कळविले. पत्र व आश्वासन मिळाल्यावरच दि.१२ ला सायंकाळी हे उपोषण स्थगित केले.



