पिक विमा मंजूर असूनही 21 हजाराहून अधिक शेतकरी अद्यापही वंचित, शिवसेनेचे (उ, बा, ठा ) यांच्यावतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी प्रीमियम भरले असतानाही, अद्याप पर्यंत त्यांना पिक विमा रक्कम प्राप्त झालेला नाही. यासंदर्भात शिवसेनेचे (उ, बा, ठा ) तालुकाप्रमुख संतोष दांडगे, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, दत्ता पाटील सह संपर्क प्रमुख, तुकाराम काळपांडे उपजिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
शिवसेने च्या (उ, बा, ठा) यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2024 -25 या कालावधी जळगाव जामोद तालुक्यातील एकूण 26, 561 शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला आहे. त्यापैकी फक्त 5,162 शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली असून उर्वरित 21,399 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
यामध्येही 2 सप्टेंबर 2025 रोजी फक्त 1088 शेतकऱ्यांना 2.55 कोटी रुपयांची विमा रक्कम वितरित करण्यात आली. यापूर्वी फक्त 4074 शेतकऱ्यांना7.73 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. एकूण मंजूर विमा रक्कम 27.57 कोटी असताना आतापर्यंत फक्त 10.29 कोटीचे वितरण झाले असून उर्वरित 17.27 कोटी रुपये अद्याप देय आहेत.
शिवसेनेच्या (उ, बा, ठा ) शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त करताना विमा कंपन्या आणि शासन शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप केला. कोट्यावधी रुपयांचे प्रीमियम भरूनही केवळ 25 टक्क्याहून कमी रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यातील पिक विमा मंजुरीच्या तुलनेत वितरणामध्ये जळगाव जामोद चा क्रमांक जिल्ह्यात खालून दुसरा आहे. याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
शेवटी, दि 30 सप्टेंबर 2025 पूर्वी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे(उ, बा, ठा) कार्यकर्ते योगेश मनसुटे ( उपविभाग प्रमुख) सुधीर पारवे ता प्रसिद्धी प्रमुख तेजराव पाटील, कैलास सिंह राजपूत, गजानन इंगळे, कुणाल दळवी, सागर बगे, निखिल खिरोडकार, सुभाष माने, गोपाल कात्रे तमाम शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.



