तेल्हारा शहरात मुस्लिम समाजातील ईद- ए – मिलादुन्नबी उत्साहात संपन्न !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा :- शहरात शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजातील ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस ,उत्सव शांततेत व उत्साहात संपन्न झाला . जगाला शांततेचा व मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद ( स. अ.) यांच्या जयंती निमित्त तेल्हारा शहरातील जश्ने ईद -मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने शहरात जुलूस ( मिरवणुकीचे) आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मिरवणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव विकास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत करण्यात आले.
सदर मिरवणुकी मध्ये मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने विविध प्रकारचे आकर्षक देखावे सादर करून उत्कृष्ट सजावटीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीमध्ये मक्का मदिना येथील खाना -ऐ -काबाची साकारलेली प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. मिरवणुकीचे तेल्हारा शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले असून संत तुकाराम महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट) च्या वतीने मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले , याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव विकास पवार, महेश पाटील खारोडे तालुका अध्यक्ष, अनिकेत नेमाडे युवक तालुका अध्यक्ष, संदीप खारोडे शहर अध्यक्ष, संघर्ष बोदडे शहर महासचिव, सचिन पोहरकार युवक शहर अध्यक्ष, शेख इसताक तालुका उपाध्यक्ष, अजय शामस्कार, पवन कडू जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी आघाडी, जय पोहरकार, संघर्ष वानखडे, हिमांशू गावंडे, ॲड. नासिर शेख, मुजाहिद कुरेशी, अमीन सरकार, कृष्णा खारोडे, सतिष मामनकार, सुरज साळुंखे, किशोर खाडे, सुधीर पाथ्रीकर, साहिल परदेशी, शेख फरीद, मोईन खान यांचे सह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते या उत्सवा मध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.



