खानदेशबुलढाणामनोरंजनमहाराष्ट्रमुबई

मौजे नेवरे गाव ( शहापूर )शेलवले पाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव .

शहापूर – ( सचिन शेलवले )
मौजे नेवरे गावातील शेलवले कुटुंबामध्ये सर्व कुटुंब एकत्र येऊन सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतात . या वर्षी या शेलवले पाड्यातील गणेशोत्सवाने ३४ व्या वर्षात पर्दापण केले आहे . हा सात दिवसाचा गणेश उत्सव श्री . दयानंद गोपाळ शेलवले यांच्या घरी बसविण्यात आला आहे . प्रत्येक कुटुंबात पाच पाच वर्ष गणपती ठेवला जातो . अशा प्रकारे प्रत्येक पाच वर्षाने फिरता गणपती प्रत्येक कुटुंबात ठेवला जातो . गणपती सणानिमित सर्व शेलवले परिवार तसेच आप्त नातेवाईकांची रेलचेल असते . सर्वजण पहिल्या दिवसापासुन नियमित आरती, हरिपाठ तसेच नंतर जागर नृत्य काम करतात . यात सर्व जण मनोभावाने सामील होतात . शेलवले पाड्यातील महिलामंडळ एकत्र येऊन हरितालिका सण, त्रप्रषिपंचमी व गौरीच्या सणानिमित्त एकत्र येऊन सण साजरा करतात . रात्रीचे जागर भजन, संगीत गाणी तसेच नृत्य काम करतातत . यामध्ये सर्व महिलांचा समावेश असतो . नव तरुण बालगोपाळ तसेच तरुण युवक हे सुद्धा एकत्र येऊन नृत्य व खेळात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतात . आता सर्व जबाबदारी नवयुवकांवर टाकलेली आहे . त्याची जबाबदारी चोखपणे ते सांभाळतात . या दिवसात लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, जोडप्यांसाठी, सासू सुनांसाठी अनेक मनोरंजक खेळ घेऊन विजयी झालेल्या प्रथम आलेल्याला बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढविला जातो . यावर्षी स्वःतच्या आर्थिक खर्चातून श्री . रुपेश दयानंद शेलवले व सौ . निता रुपेश शेलवले यांनी स्वतहून अनेक प्रकारचे मनोरंजक खेळाचे नियोजन करून तसेच प्रत्येक खेळाला बक्षिसाचे वितरण स्वहस्ते केले . त्याला सर्वांकडुन खुप प्रतिसाद मिळाला . एकत्र येऊन पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तसेच शेवटच्या दिवशी भोजन पक्वानाचे आयोजन करून जेवणाचा आस्वाद घेतात . ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे . त्यामुळे या सणानिमित्त सर्व शेलवले परिवार गुण्यागोविंदाने एकत्र येतात व या सणातील आनंदाचा आस्वाद घेतात . या वर्षी नवतरुण शेलवले परिवारातील मंडळाचे अध्यक्ष गणेश दत्तात्रय शेलवले यांनी सुंदर नियोजन करून यावर्षी चांगल्या प्रकारे सहकार्य केले . या अध्यक्षांचे तसेच ज्यांनी मनोरंजक खेळ घेऊन बक्षिसाचे वितरण केले त्यांना मंडळाकडुन खुप खुप धन्यवाद देण्यात आले . तसेच ज्यांनी यामध्ये सिंहांचा वाटा घेतला त्यांचे सुद्धा मंडळा कडुन खुप खुप कौतुक .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button