बुलढाणामहाराष्ट्र

अपरा एकादशी निमित्त दहिगाव येथील श्रीनाथ वृद्धाश्रमात अल्पौपहाराचे वाटप!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी

दहिगाव /तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथील श्रीनाथ वृद्धाश्रमा वैशाख अपरा एकादशीच्या निमित्ताने वृद्ध नागरिकांसाठी सात्विक आणि पौष्टिक अल्पौपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे वृद्धाश्रमातील सर्व रहिवाशांना प्रेमपूर्वक आणि आदरभावाने अल्पौपहार वितरण करण्यात आला.

  या उपक्रमाचे आयोजन युवा सामाजिक कार्यकर्ते आणि सोपान टेक वाहिनी चे संस्थापक सोपान गोमासे, कोटक सिक्युरिटीज चे प्रतिनिधी अंकुश मेंढे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रसिद्धी प्रमुख कुणाल हेरोडे, तसेच पंकज देव यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या प्रसंगी आयोजकांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांशी संवाद साधून, सौहार्दपूर्ण वातावरणात आहाराचे वितरण करुन धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमात अपरा एकादशीचे अध्यात्मिक महत्त्व विशद करण्यात आले आणि वृद्धांचा आशिर्वाद घेऊन, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलविण्याचा अल्पसा प्रयत्न उपस्थितांकडुन करण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी श्री नाथ वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार धरमकर, अधीक्षक मनोज शर्मा, परिचारिका कु. शिल्पा जानराव गवई, सौ. लता प्रकाश मोगरे, सुरेंद्र सोळंके, तसेच गावातील काही सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button