छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव होणार साजरा

छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव होणार साजरा
स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
दरवर्षी प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज जयंती महारजांच्या चौकात जागेवरच साजरी व्हायची पण यावर्षी सर्व तरुण बांधव एकत्र आल्याने या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती भव्य दिव्य शोभायात्रा काढुन साजरी करायची असे ठरवीले या नियोजना साठी एक बैठक पार पडली आणी बैठकीत विविध प्रश्नांनवर चर्चा झाली.
धर्मविर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14मे 1657मध्ये पुरंदर किल्या वर छत्रपति शिवाजी महाराज व आईसाहेब सईबाई यांच्या पोटी झाला. या वर्षी शेगांव शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असुन या नियोजनार्थ छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समीती ची स्थापना करण्यात आली.
या समीतीच्या माध्यमातुन हा जन्मोत्सव सोहळा पार पडणार असुन
महाराज आपले आराध्य आहेत आपण सर्व तरुण एकत्रित येवुन शेगाव शहर व ग्रामीण हा सोहळा साजरा करु.असे आव्हान छत्रपति संभाजी महाराज जन्मोत्सव समीती कडून करण्यात येत आहे..



