जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

विद्यार्थी विकास अंतर्गत जागतिक विश्व पुस्तक दिवस साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अर्जुन गोरले

आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी, प.पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचालित .कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा काकोडा. विद्यार्थी विकास अंतर्गत जागतिक विश्व पुस्तक दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये प्राध्यापक मनोज वाघ यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी पुस्तक वाचून जीवनामध्ये आपण किती मोठे होऊ शकतो याबद्दल उदाहरण दिले त्यानंतर वाचाल तर वाचाल हा संदेश दिला. प्राध्यापक गजानन पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनाबद्दलचे महत्त्व सांगितले. ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय पुस्तक पूर्ण होत नाही असे स्पष्टीकरण दिले.
प्राध्यापक अमोल नाफडे यांनी कार्ल मार्क्स यांचे विचार मांडले. कामगारांना एकत्रित या आणि संघर्ष करा.
या कार्यक्रमाकरिता विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जितेश कुलकर्णी, सहाय्यक महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापिका साक्षी कुलकर्णी तसेच प्राध्यापक अर्जुन गोरले, प्रा. मनोज न्हावी, प्रा. विनोद भालेराव,
प्रा. गोपाल सोनवणे, प्राध्यापिका योगिता पाटील, प्रा. वृषाली शिमरे या उपस्थित होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button