बुलढाणामहाराष्ट्र
खामगाव तहसील येथील पुरवठा अधिकरी पदी बावणे साहेब यांची नियुक्ती…

खामगाव तहसील येथील पुरवठा अधिकरी पदी बावणे साहेब यांची नियुक्ती…

खामगाव, प्रतिनिधी रोकडे
खामगाव तहसील मधील पुरवठा अधिकारी हे पद बरेच दिवसापासून रिक्त असल्यामुळे येथील श्री ठाकरे साहेब तसेच श्री जोशी साहेब यांनी आतापर्यंत पदभार सांभाळला होता. परंतु याच्या व्यतिरिक्त अधिक त्यांच्याकडे कामाचा ताण असल्यामुळे श्री बावणे सर यांची पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता खामगाव तहसीलचे विशेषता पुरवठा विभागाचे काम योग्यरीत्या आणि रीतसर होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. यावेळी रेशन दुकानदार तसेच ऑफिस स्टॉप, कर्मचारी यांनी पुरवठा अधिकारी बावणे सर यांचे अभिनंदन केले, त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला..



