महाराष्ट्रविदर्भ

शेतक-यांनी इफको नॅनो खताबरोबरच उस पिकात कृत्रीम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे-बिपीन कोल्हे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

शेतक-यांनी इफको नॅनो खताबरोबरच उस पिकात कृत्रीम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे-बिपीन कोल्हे

कोपरगाव किसन पवार :

     साखर उद्योगात प्रचंड स्पर्धा आहे, दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत आहे, शेतक-यांनी इफको नॅनो खताबरोबरच उस पिकात कृत्रीम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवावे, कार्यकारी संचालक, साखर सरव्यवस्थापक, उस विकास अधिकारी, आणि शेतकी विभागाशी निगडीत अधिका-यांनी या परिससंवादातुन आत्मसात केलेले ज्ञान थेट सभासद उस उत्पादक शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे त्यातुन कारखान्याबरोबरच परिसराचा विकास साधावा असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. 

        इफको नविदिल्ली व संजीवनी गृपच्या सहकार्याने शुक्रवारी शिर्डी येथे उस पीक खत व्यवस्थापनात नॅनो खतांचा वापर, कृत्रिम बुध्दीमत्तेचा उस उत्पादन व साखर उता-यात प्रभावी वापर या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित करण्यांत आला होता त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते. राज्यभरातील विविध साखर कारखान्यांच्या २०० प्रतिनिधींनी यात सहभाग नोंदविला. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, औद्योगिक विकासाचा पाया अधिक मजबुत करण्यांसाठी साखर उद्योग हा मुख्य घटक आहे. मात्र अलिकडच्या काळात त्याकडे सर्वाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. कापड उद्योगाप्रमाणेच साखर उद्योगाची अवस्था सुरु आहे. शेतकरी कामगार व त्यावर अवलंबुन असणार सर्वच घटक टिकले पाहिजे सहकार क्षेत्राने या राज्याबरोबरच देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे, मात्र त्याच्यासमोर आता खाजगीचे आव्हान उभे राहिले आहे. सहकार वाचला पाहिजे. एफआरपी देतांना साखर कारखान्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे, तेंव्हा साखरेसह इथेनॉल विक्रीचा दरही त्या प्रमाणांत वाढला पाहिजे, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने पावले उचलावी, ज्यांच्याकडे उसाची प्रत्यक्ष उपलब्धता आहे त्यांनाच गाळप क्षमता वाढविण्यांची परवानगी द्यावी अन्यथा यातुन अनेक प्रश्न निर्माण होतील. आज जग दिवसेंदिवस जवळ येत आहे. १८० दिवस चालणारा हंगाम आता ८० ते ९० दिवस चालत आहे. शेतक-यांची प्रति एकरी उस उत्पादकता दिवसेंदिवस कमी होऊन ती अवधी २५ टनांपर्यंत खाली आली आहे. ठिबक सिंचनाबरोबरच, आर्टिफिशियल इंटेलीजिअन्स   (कृत्रीम बुध्दीमत्ता) चा प्रभावी वापर उस व अन्य पीक उत्पादन वाढीसाठी व्हावा ही अपेक्षा, या परिससंवादातील ज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावे त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, जगात अन्न वस्त्र निवारा याबरोबरच तंत्रज्ञान ही चौथी गोष्ट प्रत्येकाला गरजेची झाली आहे. युवापिढी त्यात वाकबगार आहे असेही ते म्हणाले.

        इफको (पुणे) चे वरिष्ठ विपणन डॉ एम. एस. पोवार यांनी उस पीक खत व्यवस्थापनामध्ये इफको नॅनो खतांचा वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, तर उस उत्पादन व साखर उता-यात वाढ यासाठी एआय कृत्रिम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर याविषयी मृदा शास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ डॉ विवेक भोईटे, वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट (पुणे) चे पीक उत्पादन व संरक्षणातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी मार्गदर्शन केले. इफको एम. सी. (पुणे) चे विभागीय विपणन व्यवस्थापक दौलत  बोरस्ते यांनी उस रोग व कीड व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करून अधिका-यांच्या शंकांचे निरसन करून इफकोच्या विविध कीटकनाशक उत्पादनाविषयी माहिती दिली. इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक यु. आर. तिजारे यांनी प्रास्तविक केले, इफको अहिल्यानगर व कोपरगावचे क्षेत्रीय अधिकारी वैभव ढेपे, तुषार गोरड यांनी सुत्रसंचलन करूनआभार मानले. कार्यकम यशस्वीतेसाठी केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजी देवकर, सी. एन. वल्टे व त्यांच्या सर्व सहकारी बांधवांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button