खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरला स्वतंत्र बाजार समिती; आ.चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला यश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

 मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाची शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. या निर्णयामुळे आता मुक्ताईनगर तालुक्यासाठी स्वतःची स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. राज्य शासनाने या संदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर या तीन तालुक्यांसह भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसराचाही समावेश होता. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी दूरवर घेऊन जावे लागत होते. वाहतूक खर्च, वेळेचा अपव्यय आणि बाजारात मालाची साठवणूक करताना येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. शेतकऱ्यांच्या या त्रासाची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी बाजार समितीच्या त्रिभाजनाची मागणी लावून धरली होती.

आमदार पाटील यांनी यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाशी सतत पत्रव्यवहार केला आणि प्रशासकीय स्तरावर बैठका घेऊन या विषयाला प्राधान्य दिले. त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर १७ एप्रिल २०२५ रोजी यश आले. राज्य शासनाने शासन निर्णयानुसार बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाला अधिकृत मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील एकूण ६५ तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे विभाजन झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर आणि भडगाव या तालुक्यांचा यात समावेश असून, मुक्ताईनगरला आता स्वतःची स्वतंत्र बाजार समिती मिळणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या जवळच शेतमालाची विक्री करणे सोपे होणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची आणि उत्साहाची लाट पसरली आहे. बाजारपेठ जवळ आल्याने वाहतूक आणि वेळेची बचत होणार आहे, तसेच मालाची साठवणूक आणि विक्रीची चांगली सोय उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

या यशाबद्दल बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, “हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या संघर्षाचे आणि आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. यामुळे मुक्ताईनगर तालुक्याच्या शेतीला निश्चितच एक नवीन बळ मिळेल.”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button