महाराष्ट्रविदर्भ

डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य समाज हिताचे आ डाँ संजय कुटे साहेब…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगांव जामोद

असलगाव.डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य समाज हिताचे आहे असे प्रतिपादन आ डाँ संजय कुटे यांनी केले. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यावतीने 2 मार्च रोजी सकाळी 8 वा आसलगाव येथे गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
प्रदूषण दूषित पाणी दूषित हवा यामुळे आपल्या आरोग्य धोक्यात येते. स्वच्छता करताना आपल्या आसलगावातील ओला कचरा7.73 क्विंटल आणि सुका कचरा 45.72 क्विंटल जमा करून त्याची योग्य विल्हेवाट करण्यात आली. प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियान, व रक्तदान शबीर वृक्षरोपण संवर्धन रस्ता दुरुस्ती प्रौढ साक्षरता, शिक्षण, विहिरीतील गाळ उपसने, पाणपोई, शालेय साहित्य वाटप असे यासह उपक्रम राबवले जातात अशा अनेक उपक्रमातील कार्याची दखल म्हणून शासनाने वेळोवेळी अनेक पुरस्कारांनी डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला सन्मानित करण्यात आले आहे. आसलगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय ते बाजार गल्ली बस स्टॉप जिल्हा परिषद हायस्कूल, धान्य मार्केट ते जळगाव जामोद ठोकणे लेआउट ते टाकळी रोड तसेच गावातील प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छतेचा कार्यक्रम राबविण्यात आला

गावातील 400 च्यावर सदस्यांचा सहभाग या स्वच्छते मोहिमेत, आसलगाव, तामगाव, शेगाव, खामगाव, तांदुळवाडी, शेंबा या गावातील परिसरातील 400 च्यावर संख्येने सदस्य उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या जळगाव जामोद मतदारसंघाचे आ डाँ संजय कुटे, गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे, आसलगाव सरपंच विष्णू इंगळे तसेच आसलगाव ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादी मान्यवरांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला त्याचप्रमाणे आसलगाव, कुऱ्हा काकोडा, मुक्ताईनगर, बोदवड, यासह महाराष्ट्र राज्यात तसेच राज्याबाहेर सुद्धा लाखोच्या संख्येत सदस्यांनी सहभाग घेऊन स्वच्छता अभियान पार पाडले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button