महाराष्ट्र

बहुजन युथ पँथर च्या महिला जिल्हाध्यक्षा यमुनाताई देवराव भालेराव यांचे राहुरी तहसील समोरील आवारात असणाऱ्या तीन अन्नधान्य गोडाऊन येथे तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बाबत.आमरण उपोषण

बहुजन युथ पँथर च्या महिला जिल्हाध्यक्षा यमुनाताई देवराव भालेराव यांचे राहुरी तहसील समोरील आवारात असणाऱ्या तीन अन्नधान्य गोडाऊन येथे तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बाबत.आमरण उपोषण
राहुरी तालुक्यातील तहसील आवारात असणाऱ्या तहसील समोरील तीन अन्नधान्याचे गोडाऊन येथे मोठ्या प्रमानात धान्याचा उरलेला साठा लंपास होत आहे असे निदर्शनास आले आहे. असे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या तिन्ही अन्नधान्य गोडाउन मध्ये आतून व बाहेरून तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.त्यांनतर तीन गोडाउन मध्ये येणारा जाणारा सर्व कोठयाची माहिती संदर्भात असणाऱ्या सर्व लेखाजोखा यांची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच तहसीलच्या उत्तरभागात पूर्ण तार कंपाऊंड करण्यात यावे व चिंचाच्या झाडापासून सेतूकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता तात्काळ बंद करण्यात यावा हे येत्या ३० तारखेच्या आत न झाल्यास व ३० तारखेच्या आत गोडाउनला सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्यास.कार्यालयासमोर अजून तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल व पुढील काळात काही अनुसूचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी ही राहुरी तहसील कार्यलयाची राहील अशी मागणी यमुनाताई देवराव भालेराव यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button