खानदेशजळगावा जिल्हा

दहावीच्या बोर्डाच्या पेपरला मुक्ताईनगर मध्ये 853 विद्यार्थ्यांनी दिला मराठी व उर्दू विषयाचा पहिला पेपर*

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

आज 21 फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. यावेळी मराठी व उर्दू विषयाचा आज पहिला पेपर असल्याने मुक्ताईनगर शहरात असलेले जे ई स्कूल व ज्युनिअर कॉलेज हे सर्वात मोठे परीक्षा केंद्र असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची सकाळपासूनच गर्दी बघावयाला मिळाली. परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळी जमलेली दिसून आली. परीक्षेला मराठी विषयाच्या पेपर साठी एकूण 747 विद्यार्थी होते तर उर्दू हायस्कूलचे एकूण 106 विद्यार्थी होते असे परीक्षा केंद्रावर एकूण 853 विद्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. परंतु त्यातील 6 विद्यार्थी हे परीक्षेला गैरहजर होते. त्यामुळे एकूण 853 विद्यार्थ्यांनी दहावीच्या मराठी व उर्दू विषयाची बोर्डाची परीक्षा आज दिली आहे. मराठी विषयाच्या पहिल्या पेपरला कोणताही अनुचित प्रकार किंवा कॉपी केस झालेली नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने चौख पोलीस बंदोबस्त यावेळी दिला तर दबंग गिरी करणाऱ्या टवाळखोर मुलांना देखील वचक बसेल. याकडे जे ई स्कूल चे प्राचार्य यांनी देखील गांभीर्य समजून लक्ष देण्याची गरज आहे. जे ई स्कूल व ज्युनिअर कॉलेज या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून संजय सांगळकर हे होते. तर बिल्डिंग कंडक्टर म्हणून एस के काळे, एन ए देशमुख, ए एस कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button