शेगावात गतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव येथील गजानन महाराज गतिमंद विद्यालयाच्या चौदा विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. यापैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून उर्वरित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यालयामध्ये काल सोमवारी रात्री जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा पार पडली. स्पर्धा आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना
जेवण देण्यात आले, ज्यामधून या गतिमंद विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे कळते. विद्यालयातील एकूण १४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, त्यापैकी ज्ञानेश दीपक आखरे (११) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अभिषेक दिगंबर परिहार (१४) आणि राजदीप रत्नदीप हिवाळे (१५) हे दोन विद्यार्थी अत्यवस्थ असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले आहे. वेदांत नितीन महाजन
(१६), जयेश दिलीप पाटील (१८), यश निलेश जाधव (११), प्रथमेश विलास मानकर (१०), गुंजन विजयसिंह बोराडे, विलास नामदेव वाढे (११), दत्ता दिनकर काटे (१२), देवेंद्र युवराज भारंबे (११), दीपक प्रल्हाद कोल्हे (१२), कुणाल विलास साळी (१०), या नऊ विद्यार्थ्यांवर शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत



