जळगावा जिल्हा

शौर्य दिनाचा इतिहास मानवता व स्वाभिमानाची प्रेरणा देतो : जयसिंग वाघ

जळगाव :- जनतेवर अत्यंत जुलूम , जबरदस्ती करून त्यांचे जिणे मुश्किल करणाऱ्या शासना विरोधात सन १८१८ ला जगात प्रथमच मोठे युद्ध झाले यात अवघ्या पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार सैन्य कापून काठले व सत्ता उलथवून लावली . त्या क्रांतीचे स्मरण व्हावे म्हणून १ जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो . हा दिवस माणसाला मानवता व स्वाभिमान काय असतो हे दाखवून देतो असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
१ जानेवारी रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल , परिवर्तन ग्रुप तर्फे शौर्य दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात भाषण करतांना वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की , जगात अश्या प्रकारचे शौर्य आज पर्यंत कोणीही केलेले नाही . अनेक राजे लोकांनी अनेक लढाया केल्या , जनतेने शासन विरोधात अनेकांनी सशस्त्र उठाव केला पण एवढ्या कमी प्रमाणात असलेल्या लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येने सैन्याला साक्षात कापून काढल्याचा पराक्रम कोणीही केलेला नाही . या ऐतहासिक पराक्रमा पासून शासन करणाऱ्यांनी सुद्धा धडा घ्यावा असेही आवाहन वाघ यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश इंगळे , प्रास्ताविक सागर सदावर्ते , आभार युवराज पारधे यांनी केले. बी. एस. पवार यांनी मनोगत व्यक्त केले , सुरवातीस सामूहिकपणे त्रिसरण , पंचशिल घेण्यात आले . त्या नंतर समता सैनिक दलाचे डॉ. सचिन नरवाडे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना दिली . परिवर्तन ग्रुप तर्फे पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते . शौर्य दिनाच्या जय जय काराने परिसर दणाणून गेला होता.
या प्रसंगी मोहन बिऱ्हाडे , कैलास उमाळे , स्वप्नील सोनवणे, चैत्राम भालेराव , सुनील शिरसाठ , ज्योती भालेराव , राधा जवरे , शोभा इंगळे , प्रमिला इंगळे , शोभा पातुडे , ज्योती निकम , यशोदा बागुल , विद्या झनके, ज्योती दाभाडे , भारती बिऱ्हाडे , ज्योती सोनवणे , उषा इंगळे आदींसह स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button