जळगावा जिल्हाशैक्षणिक

खडसे महाविद्यालयात मनाच्या एकाग्रतेचे विपश्यना बाल आनापान शिबिर संपन्न

           मुक्ताईनगर येथील "विपश्यना साधना समिती" व मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयाच्या "योगा वेलनेस सेंटर" यांच्या संयुक्त विद्यमानाने जिमखाना विभागात परिसरातील ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले बाल आनापान विपश्यना शिबिर रविवारी यशस्वीरीत्या पार पडले. 
          या शिबिरामध्ये मनाची एकाग्रता व जीवन जगण्याची कला अवगत करून आयुष्य सुंदर व संस्कारक्षम पद्धतीने कसे जगावे हे शिकायला मिळते. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी,सकाळी 8:30 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत असे या शिबिराचे आयोजन केलेले असून; शिबिर हे विनामूल्य असते.आयोजकांनी परिसरातील पाल्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकांना केलेले आहे.
         सदर शिबिर यशस्वितेसाठी परिसरातील विपश्यना साधना समितीतील साधक व साधिका तसेच खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री एच. ए.महाजन व जिमखाना प्रमुख प्रा.सौ.प्रतिभा ढाके स्वयंस्फूर्तीने सतत कार्यरत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button